Hot Posts

6/recent/ticker-posts

जापनीज मेंदुज्वर प्रतिबंधक लसिकरण मोहिम तालुक्यात पहिल्या दिवशी ४ हजार ५४० मुलांचे लसिकरण तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.बोधले

 जापनीज मेंदुज्वर प्रतिबंधक लसिकरण मोहिम तालुक्यात पहिल्या दिवशी ४ हजार ५४० मुलांचे लसिकरण तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.बोधले


 

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जापनीज मेंदुज्वर लसिकरण मोहिम जिल्ह्यात दिनांक ०३ जानेवारी पासून सुरुवात झाली असून, या मोहिमेत वयोवर्षे ०१ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यात शहर व ग्रामीणमध्ये पहिल्याच दिवशी इयत्ता  १ ली ते ९ वी   पर्यंच्या शाळेतील ४ हजार ५४०  मुलांना लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.

            पंढरपूर तालुक्यातील वयोवर्षे ०१ ते १५ वयोगटातील  सुमारे  १ लाख २२  हजार ८०१ मुलांना जापनीज मेंदुज्वर प्रतिबंधक लस देण्यात येणार असून, यासाठी २८ हजार ६३६  वॅक्सिन उपलब्ध झाल्या आहेत.  आज ग्रामीण भागातील इयत्ता  १ ली ते ९ वी   पर्यंच्या शाळेतील ४ हजार ७६ विद्यार्थ्यांना लस दिली. तर शहरात यशवंत विद्यालय पंढरपूर येथील  ४६४  विद्यार्थ्यांना मेंदुज्वर प्रतिबंधक लस देण्यात आली.

 पहिल्या टप्प्यात   इयत्ता  १ ली ते ९ वी   पर्यंच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी व शाळाबाह्य मुलांना  मेंदुज्वर  लस देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्रे  व अंगणावाडी केंद्रे या ठिकाणी लसिकरण मोहिेमेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शहरी भागात सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे या ठिकाणी लसिकरण मोहिेमेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत शिक्षण विभाग तसेच  महिला व बालकल्याण विभागाच्या सहभागाने तालुक्यातील वयोवर्षे  ०१ ते १५ वयोगटातील मुलांचे १०० टक्के लसिकरण  करण्यात येणार असल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी दिली.

जापानीज मेंदुज्वर हा विषाणुजन्य आजार आहे. तो डासांमुळे पसरतो. या आजाराचे लक्षण म्हणजे सुरुवातील थंडी व ताप, डोकेदुखी , अंगदुखी अशी आहेत.या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार होण्याची शक्यता असल्याने या आजाराच्या नियंत्रणासाठी  डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. तसेच डासांमार्फत प्रसार होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने बरोबरच लसिकरण ही महत्वाचे असल्याचेही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments