Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्राह्मण वधु- वर परिचय पुस्तिकेचे १३ फेब्रुवारी रोजी होणार प्रकाशन

 ब्राह्मण वधु- वर परिचय पुस्तिकेचे १३ फेब्रुवारी रोजी होणार प्रकाशन

जास्तीत जास्त वधू-वरांनी लाभ घेण्याचे ब्रह्म प्रतिष्ठानचे आवाहन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ब्राम्हण समाजातील वधू-वर, पालक यांच्या वाढत्या अपेक्षा वधूंच्या संख्येचे घटते प्रमाण, वयातील अंतर, उच्च शिक्षण, आपसातील संपर्क करण्यासाठी येणाऱ्या अडचणी या कारणांमुळे सुयोग्य जोडीदार शोधणे ही एक समस्या झाली आहे. या समस्येची तीव्रता कमी व्हावी तसेच जास्तीत जास्त वधु-वरांचे "शुभमंगल" ब्रह्मप्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावे या दृष्टीने संस्था हा उपक्रम राबवीत आहे. संस्थेमार्फत वर्षातून एकदाच वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशित केली जाते.
ब्रह्म प्रतिष्ठान सोलापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व शाखीय ब्राह्मण वधु- वर पुस्तिका रविवार दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. गणेश मंदिर,ब्रम्हचैतन्य सोसायटी नवीन RTO जवळ सोलापूर येथे प्रकाशित केली जाणार आहे.
गेल्या दहा बारा वर्षातील संस्थेस मिळत असलेल्या वधु-वर पालकांचा वाढता प्रतिसाद पाहता अंदाजे ५०० ते ६०० वधु-वरांच्या नोंदणी अपेक्षित आहेत. नोंदणीसाठी बाशी, सोलापूर, पुणे येथे केंद्रे ठरविण्यात आली असून त्या-त्या ठिकाणी वधू-वर नोंदणी होणार आहे. संबंधितांनी या केंद्राचा लाभ घ्यावा. हा पुस्तिका प्रकाशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतक त्याचसोबत सर्व ब्रह्मवृन्दांनी सक्रीय सहभागी व्हावे म्हणजेच, आपल्या ओळखीतील इच्छुक ब्राह्मण वधु-वरांची आपल्या ह्या मेळाव्यात नाव नोंदणी करावी. नोंदी करण्यात आलेल्या वधु-वरांच्या तपशिलाची पुस्तिका त्याच दिवशी दिली जाईल. ब्रह्म प्रतिष्ठान संस्था ही ब्राह्मण समाजासाठी विविध सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. आमच्या संस्थेमार्फत, वर्तमान काळातील एक गरज म्हणून स्वतंत्रपणे ११ वर्षापासून गोशाळाही चालविली जात आहे. या गोशाळेसाठी समाजातील विविध व्यक्तींचा आर्थिक तसेच वैयक्तिक सहयोगही मोठ्या प्रमाणावर लाभत आहे. या पवित्र कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहभागाची अपेक्षा करीत आहोत.
     वधु-वरांच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख ८ फेबुवारी २०२२ निश्चित करण्यात आलेली आहे.
संबंधितांनी आपल्या विवाहेच्छुक पाल्यांची नोंदणी वेळेपूर्वी करण्यासाठी संस्थेमार्फत आवाहन करण्यात येत आहे. अधिक तपशीलासाठी संपर्क करावा.१) सुहास देशपांडे (संस्थापक अध्यक्ष) मो नं-७७०९०८०७२१,२) राघवेन्द्राचार्य आद्य गुरुजी (अध्यक्ष)- मो नं-८८८८२१४७५४,३) पद्मजा मोकाशी (कोषाध्यक्षा)- मो नं-९६६५१८६७९६,४) सुजाता देशपांडे (सदस्य)- मो.नं.-८२०८२१४३०९ असे आवाहन ब्रह्म प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने करण्यात येत आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments