Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात 101 सावित्रीच्या लेकींनी केले वृक्षारोपण ; मुली वाचवा, झाडे जगवाचा संदेश

 सोलापूरात 101 सावित्रीच्या लेकींनी केले वृक्षारोपण ; मुली वाचवा, झाडे जगवाचा संदेश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग व कृषी पदवीधर संघटनायांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्यालयातील 101 महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सामाजिक संदेश देण्यात आला.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांच्या हस्ते  झाडाला पाणी घालून वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ झाला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधिन शेळकंदे, स्मिता स्वामी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, पंडित भोसले,कोळी,  जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, आनंद तानवडे, कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे, कुशाबा इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments