Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात तब्बल 91 लाख टन ऊस गाळप

 सोलापूर जिल्ह्यात तब्बल 91 लाख टन ऊस गाळप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा सोलापूर जिल्ह्यात चालू असलेल्या 32 साखर कारखान्यात 1 जानेवारीअखेर 91 लाख 26 हजार 778 टन ऊसाचे गाळप झाले असून सरासरी 8.71 टक्के साखर उताऱ्याने 79 लाख 48 हजार 465 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपात पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना तर सरासरी साखर उताऱ्यात श्रीपूरचा पांडुरंग कारखाना जिल्ह्यात आघाडीवर आहेत.
चालू मोसमात राज्यात 95 सहकारी व 94 खाजगी मिळून 189 कारखाने ऊस गाळप करीत आहेत. राज्यात 1 जानेवारी अखेर 479.85 लाख टन ऊसाचे गाळप झाले असून 9.69 टक्के सरासरी साखर उतारा मिळून 465.2 लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. राज्यात कोल्हापूर विभागातील 35 कारखान्यात सर्वाधिक 127.60 लाख क्विंटल तर त्यापाठोपाठ सोलापूर विभागातील 44 कारखान्यात 100.74 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात चालू हंगामात 12 सहकारी व 20 खाजगी अशा 32 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात आतापर्यंत 37 लाख 9 हजार 505 लाख टन ऊसाचे गाळप होऊन 33 लाख 12 हजार 915 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तुलनेत खाजगी साखर कारखान्यांनी 54 लाख 17 हजार 273 लाख टन ऊस गाळप झाले असून 46 लाख 35 हजार 550 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील खाजगी साखर कारखान्यांनी एकूण गाळपाच्या जवळपास 60 टक्के ऊस गाळप केला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. असे असले तरी सहकारी साखर कारखान्यांचा साखर उतारा (8.93 टक्के) खाजगी कारखान्यांच्या (8.56 टक्के) तुलनेत अधिक आहे. 1 जानेवारी या एकाच दिवसात जिल्ह्यातील कारखान्यांनी एक लाख 20 हजार 457 टन ऊसाचे गाळप करून 9.58 टक्के सरासरी साखर उतारा मिळवून एक लाख 15 हजार 400 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
कारखाना गाळप साखर उतारा
- वि.शिंदे पिंपळनेर 913950- 800250- 8.76
- सहकार महर्षी 542477- 471850- 8.70
- सिद्धेश्वर 497170- 427855- 8.61
- पांडुरंग 469667-484250- 10.31
- जयहिंद 467044- 366550-7.85
- लोकमंगलभंडारकवठे 455950-356500- 7.82
- गोकुळ माऊली 358549- 301800-8.42
- बबनराव शिंदे 352335- 351850- 7.85
- लोकनेते 349940-345100- 9.86
- सिध्दनाथ 311545- 244100- 7.84
- युटोपिअन 308157- 210000- 6.81
- वि.शिंदे करकंब 279468- 258050- 9.23
- विठ्ठल कार्पोरेशन 278177- 236300- 8.49
- सासवड माळी 275779- 238930- 8.66



Reactions

Post a Comment

0 Comments