महाराष्ट्रात लवकरच मिनी लॉकडाऊन लागणार?
राज्यात ६८ ओमायक्रोन रुग्ण, १२,१६० नवीन कोरोना रुग्ण
मुंबई (कटूसत्य वृत्त):- एकिकडे कोरोना तर दुसरीकडे ओमिक्रॉनचा कहर सुरूच आहे, राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज राज्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५७८ झाली आहे.
महाराष्ट्रात आज १,७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१४,३५८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५% एवढे झाले आहे.
आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ११ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
0 Comments