Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आ.विजयकुमार देशमुखांसह बगलबच्यांचे काळेबाजार जनतेसमोर येणार

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आ.विजयकुमार देशमुखांसह
बगलबच्यांचे काळेबाजार जनतेसमोर येणार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच येणार प्रशासक

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार सूर्यकांत व्हनमाने व बसवराज माळगे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. या तक्रारीवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्याची सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना केली. बाजार समितीच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. तीन अधिकाऱ्यांनी मदतीसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर उपस्थित केलेल्या ३२ मुद्यांवरील चौकशीचा अहवाल आता जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना सादर केला जाणार आहे.
सहकारमंत्री पाटील यांनी दिलेल्या सूचनेनूसार जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी तीन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यामध्ये सहकार विभागाचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके हे पथक प्रमुख आहेत. त्यांच्या मदतीला सहाय्यक विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार व सहाय्यक विशेष लेखापरीक्षक आर. एस. नागुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे आठ अधिकारी व कर्मचारी चौकशी करुन अहवाल देणार आहेत.
काही भाडेपट्टाधारक/अडते/व्यापारी यांनी समितीच्या मालमत्ता पत्रकात पट्टेदार म्हणून नोंदणी करताना समितीची मंजुरी घेतली नाही, काही प्लॉटधारकांनी त्यांच्या भागीपत्रकातील भागधारकांच्या बदलांची नोंदी समितीच्या मंजुरीशिवाय मालमत्ता पत्रकात करून घेतल्या आहेत, समितीकडून लिजवर घेतलेल्या जागांवर काही प्लॉटधारकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले असून कर्ज घेताना संबंधितांनी व वित्तीय संस्थांनी समितीची मंजुरी घेतली नाही व समितीच्या मालमत्ता पत्रकात बोजाची नोंद केली आहे. काही प्लॉटधारकांनी समितीच्या जागा खरेदी केल्याचे मालमत्ता पत्रकात दिसून येते. काही भाडेपट्टा प्लॉटवर बॅंकांनी जप्तीचा आदेश बजावला आहे व मालमत्ता पत्रकात त्याची नोंदही करून घेतली आहे. प्लॉटधारकांनी समितीच्या उपरोक्ष मालमत्ता पत्रकात वारस नोंद, हक्कसोड, नावात बदल करुन घेतले आहेत. यासह ३२ मुद्द्यांची तक्रार सहकारमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

 

Reactions

Post a Comment

0 Comments