महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोला विद्यामंदिर येथे प्रतिमापूजन
हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटे मौन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- 'मेरा जीवन ही मेरा संदेश है' असे सांगणारे मोहनदास करमचंद गांधी हे विसाव्या शतकावर प्रभाव पाडणारे एक महान व्यक्तिमत्त्व होते. गांधीजींचे सत्य, अहिंसा, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन, स्वदेशी भूतदया आणि मानवता अशा विचारांना पाईक मानून त्यांनी आपला जीवनमार्ग अवलंबला होता. मानवता आणि अहिंसा हाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी नव्हे तर अखिल मानवजातीसाठी व्यतीत केले आणि मानवाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले त्यांनी संपूर्ण जीवनात विविध टप्प्यांवर आपल्या आचारातून आणि विचारांतून दिलेले संदेश एकविसाव्या शतकातही महत्त्वपूर्ण आहेत. सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा असावे, साक्षरतेला शिक्षण म्हणता येणार नाही, शिक्षणामुळे माणसातील मानवीगुणांचा विकास झाला पाहिजे. शिक्षण हे साध्य नसून साधन आहे, अशी त्यांची भूमिका होती, त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक ठाम विचार होता, जो मानवाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा आहे. भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घडविण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे ३० जानेवारी २०२२ रोजी मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके अध्यक्ष सां.ता.शि.प्र.मंडळ सांगोला यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संस्थासचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते गुरुवर्य कै. बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व हुतात्मा दिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण म्हणून दोन मिनिटे मौन बाळगण्यास आले . यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नारायण विसापूरे, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..
0 Comments