सोलापूर महापालिकेत सभापती व तिच्या पतीने कार्यालयाला ठोकले टाळे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गुंठेवारी मध्ये बांधकामास परवानगी मिळावी या मागणी साठी सुरू असलेल्या बैठकीच्या कार्यालयास पालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती कल्पना कारभारी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कारभारी यांनी कुलुप लावून ठिय्या आंदोलन केले.
सोलापूर महानगरपालिका येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गुंठेवारी मध्ये बांधकामास परवानगी मिळावी यासाठी बैठक घेण्यात आली. महापौर श्रीकांचना यननम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत पालिका आयुक्त पी शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटिल, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महिला बाल कल्याण समिती सभापती कल्पना कारभारी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते रियाज खैरादी, आनंद चंदनशिवे, नगरसेवक डॉ किरण देशमुख, नागेश भोगडे, प्रा नारायण बनसोडे, जेष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक तॊफिक शेख, नगरसेवक राजकुमार हंचाटे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगर रचना अधिकारी लक्षण चलवदी आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गुंठेवारी मध्ये बांधकामास परवानगी मिळावी या विषयी साधक बाधक चर्चा झाली. मात्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री आणि नगरसेवक तोफिक शेख यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली.
परंतु अंतिम निर्णय व्हावा या मागणीसाठी गुंठेवारी मध्ये बांधकामास परवानगी मिळावी या मागणी साठी सुरू असलेल्या बैठकीच्या कार्यालयास पालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती कल्पना कारभारी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कारभारी यांनी कुलुप लावून ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलना विषयी आपली भुमिका पालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती कल्पना कारभारी यांनी विशद केली.
0 Comments