Hot Posts

6/recent/ticker-posts

आधार २०२२ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, रविवारी होणार पुरस्काराचे वितरण

 आधार २०२२ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, रविवारी होणार पुरस्काराचे वितरण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय पुरस्काराचे घोषणा करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष मान्यवरांचा सत्कार संस्थेच्यावतीने गेली १३ वर्षे सातत्याने केला जात आहे. यंदाच्या वर्षी पुरस्कारामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या लोकांनी विशेष. कामगिरी केलेली आहे अशा लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावर्षी पुरस्कार देण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.१) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजसेवा राष्ट्रीय पुरस्कार- प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, सोलापूर. २) राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार- डॉ. दयानंद उजळंबे, परभणी ३) महात्मा बसवेश्वर राष्ट्राय शिक्षक पुरस्कार- डॉ. सतीश डोंगे, परभणी ४) यशवंतराव होळकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- डॉ. माधव दुधभाते, गंगाखेड ५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- डॉ. अनिता शिंदे, बीड ६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार- रामेश्वर विभुते, सोलापूर ७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट युवा उद्योजक पुरस्कार - अमोल यादव, सोलापूर. ८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार- प्रा. राजाभाऊ बनसोडे, पुणे. हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ९ जानेवारी २०२२ रोजी, सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ प्रदिप म्हैसेकर, सोलापूर येथील डॉ. नभा काकडे, गंगाखेड परभणी येथील डॉ. अनिल सिंगारे उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आशा वर्कर यांचाही पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे असणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी डॉ. धम्मपाल माशाळकर, रामजी गायकवाड, सौ.वैशाली गुंड, अभिषेक डोळसे, आदी उपस्थित होते.








Reactions

Post a Comment

0 Comments