5 राज्यांसाठी क्रांतीकारी घोषणा- ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! पहा आणखी कोणते नियम?
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करताना मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी प्रचाराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.
इच्छुक उमेदवारांना वाढत्या कोरोनाचा फटका बसण्याची दाट शक्यता त्यांच्या घोषणेनं बसण्याची शक्यता आहे. ऑफलाईन अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर निवडणूक आयोगानं बंधनं घातली आहे. 15 जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या बाबींवर बंदी घातली असून ही बंदी कायम राहणार की नाही, याबाबतची माहितीही 15 जानेवारीनंतर जारी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह मणिपूर आणि उत्तरांखंडमध्ये होणाऱ्या प्रचारावर आता निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे.
काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?
इच्छुक उमेदवारांना जो काही प्रचार करायचा आहे, तो त्यांनी शक्यतो जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीनं करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर द्यावा, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे यासोबत त्यांनी ऑफलाईन प्रचारावर मोठ्या प्रमाणात बंदी घातली आहे.
'डिजिटल प्रचार करा!'
प्रचारसभा, रॅली, बाईक रॅली, व्हेईकल रॅली, अशा कोणत्याही प्रकारच्या ऑफलाईन प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. दरम्यान, या बंदीबाबतचा पुढील निर्णय 15 जानेवारीची कोरोना परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे.
'नियम न पाळल्यास कारवाई'
रोड शो, रॅली, पदयात्रा, कुठल्याही प्रकारच्या रॅलीला परवानगी नसेल. इतकंच काय तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रॅली, सभांना परवानगी असणार नाही, असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कॉर्नर सभा, गावागावात होणारा प्रचार याबाबतही जर नियम पाळले गेले नाही, तर कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
या संपूर्ण बंदीवर 15 जानेवारीनंतर काय नेमका निर्णय होतो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यंदाची पाचही राज्यातली निवडणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीही अत्यंत अटीतटीची आणि डिजिटल निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हर्च्युअल रॅली नेमकी कशी असेल, हेही पाहणं आता महत्त्वाचं आहे.
0 Comments