Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पुल कॅम्पसचे आयोजन

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पुल कॅम्पसचे आयोजन


        सांगोला  (कटूसत्य वृत्त) :- येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हॅटसन ऍग्रो प्रोडक्स लिमिटेड या कंपनीचे तृतीय वर्ष पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी दिली.  या मुलाखत  प्रक्रिया दिनांक 29/12/2021  रोजी  सकाळी 10.00  ते 5.00 या वेळेत  शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये  पार पडणार आहे.  या  मुलाखत प्रक्रियेमध्ये मेकॅनिकल,   ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, सिव्हिल,    इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल  पदविका प्राप्त विद्यार्थी तसेच  बी. एस. सी  केमिस्ट्री  उत्तीर्ण विद्यार्थी देखील भाग घेऊ शकणार   आहेत.    शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज नेहमीच विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये  नोकरी  मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहिले असून,  या संस्थेतील अनेक    विद्यार्थी  देश- विदेशातील नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या   पुल कॅम्पस  भरती प्रक्रियेमधून  अनेक विद्यार्थ्यांना हॅटसन ॲग्रो प्रॉडक्ट्स  लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरी मिळणार असून विद्यार्थ्यांनी  या संधीचा   लाभ घ्यावा असे आवाहन  संस्थेचे अध्यक्ष श्री.  बाबुराव गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी  प्रा.  बावचे सर     ( 9960553434) यांच्याशी संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments