Ads

Ads Area

डॉ . अंत्रोळीकर प्रतिष्ठान पुरस्कारांचे थाटात वितरण डॉ. कृ.भि .अंत्रोळीकर यांचा त्याग अवर्णनीय. सुशीलकुमार शिंदे

 डॉ . अंत्रोळीकर प्रतिष्ठान पुरस्कारांचे थाटात वितरण

डॉ. कृ.भि .अंत्रोळीकर यांचा त्याग अवर्णनीय. सुशीलकुमार शिंदे


        सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- भारतीय स्वातंत्र्य लढयात मोलाची कामगिरी बजावलेल्या गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या व सच्चे गांधीवादी म्हणून नावलौकिक असलेल्या दे.भ.स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृष्ण भिमराव अंत्रोळीकर यांना देशाचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी देऊ केलेले राज्यपाल पद नाकारले. त्याग काय असतो.  हे डॉ.अंत्रोळीकर या सच्च्या देशभक्ताकडून  शिकण्यासारखे होते ते सोलापूरचे वैभव होते. .असे गौरवोद्गार  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
        स्वातंत्र्य सेनानी कृ.भा. अंत्रोळीकर स्मृती राष्ट्रीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे हे होते, यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर, मोहन अंत्रोळीकर, आदी उपस्थित होते
        याप्रसंगी, दै . पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे यांना  'कर्मयोगी' कार रामभाऊ राजवाडे स्मृती पत्रकारिता पुरस्कारा सह ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, नगरसेवक बाबा मिस्त्री यांचा पुरस्काराने तर  अंत्रोळी गावच्या सरपंच कोमल करपे यांच विशेष सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले.
पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की डॉ.अंत्रोळीकर सोलापूरचे वैभव होते, अश्या महान देशभक्त वैभवाचे स्मारक झाल्यास मला आनंद होईल.  अंत्रोळीच्या सरपंच यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे हे निश्चित कौतुकास्पद गोष्ट आहे, त्यासाठी पाहीजे ती मी मदत  करेन, हेच राष्ट्र काम आहे, त्यांच्या आठवणीतून नवीन समाजाची निर्मिती होईल. असेही शिंदे यांनी सांगितले यावेळी काका साठे यांनी डॉ  .अंत्रोळीकर यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी पुरस्कार विजेत्यानी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास डॉ. श्रीकांत कामतकर, अंत्रोळीकर कुटुंबीय, राजन काम,त केशव इगळे मनीष गडदे याशिवाय सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. रत्‍नाअंत्रोळीकर- शहा तर आभार एन. के. क्षीरसागर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close