अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने वकृत्व स्पर्धेचे आयोजन
अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने विचारांची मैफिल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने विचारांना प्रकट करण्याची संधी मिळावी त्यातून राष्ट्रहितात समाज हितात चर्चा होवुन चांगले विद्यार्थी घडावे व भावी भारताचे बोलके अधिकारी घडावे बोलका समाज घडावा यासाठी करंजकर विद्यालय येथे पाचवी ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन संगमेश्वर अरवटगीमठ व नरेश मुन्नुरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते.
या स्पर्धेत २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वकृत्व स्पर्धेत प्रथम वैष्णवी गिरीष पोतदार, द्वितीय पुजा श्रीनिवास मेंगजी, तृतीय साक्षी संदिप तोग्गी हे विद्यार्थी आले.
प्रथम क्रमांक यांना पाचशे एक द्वितीय तीनशे एक तृतीय दोनशे एक उत्तेजनार्थ एकशे एक असे बक्षिस व सर्व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे माऊली झांबरे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने प्रेरणादाई कार्यक्रम घेतले जातात व आजचा वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित करणे म्हणजे विचारांना वाट करून देवुन विद्यार्थाना घडवणे व इतिहासाची भावी पिढीस जाण करून देण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करणे हा कार्यक्रम स्थुत्य असून बाकीच्या संस्था ही असे कार्यक्रम राबवावे असे मत व्यक्त केले.
विरेश लिगाडे यांनी ही संस्थेच्या कार्यक्रम हे सामाजिक संस्थाना समाज हितात कोणते कार्यक्रम घ्यावे ह्याची दिशा दाखवतात व बक्षीसाची किंमत कमी असली तरी गवते यांची भावना खुप मोठी आहे अशी भावना व्यक्त केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका तडकसे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने सदैव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती साठी सदैव कार्यक्रम घेत असतात आणि त्यातुन मोठया प्रमाणात विद्यार्थाना शैक्षणिक मदत होते असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माऊली झांबरे, विरेश लिगाडे, रतन आळसंदे, सुहास मधली ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते,विनोद कर्पेकर , प्रशालेच्या मुख्याध्यापिका तडकसे हे प्रमुख उपस्थित होते.
0 Comments