Ads

Ads Area

प्रा. राहुल बोळकोटे व मित्र परिवारच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण, दंत व आरोग्य शिबिराचे आयोजन

 प्रा. राहुल बोळकोटे व मित्र परिवारच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण, दंत व आरोग्य शिबिराचे आयोजन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव प्रा. राहुल बोळकोटे व मित्र परिवारच्या वतीने प्रभाग क्र.१८ येथे सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण, सारथी युथ फाऊंडेशन, लायन्स आय हॉस्पिटल, दिनदयाल उपाध्याय दंत महाविद्यालय सोलापूर यांच्या सहकार्याने दंत व नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक बाबा मिस्त्री होते. प्रारंभी प्रकाश वाले यांनी राहुल बोळकोटे काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता असल्याचे सांगून येणाऱ्या काळात पक्ष अशा कार्यकर्त्यांचे निश्चित विचार करेल असे सांगितले. बाबा मिस्त्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राहुल बोळकोटे यांनी आजपर्यंत अनेक शिबिरे, मेळावे,  जनउपयोगी कार्यक्रम राबवून लोकांची मोफत कामे केली आहेत असे सांगितले. अलका राठोड, प्रमिला तूपलवंदे, भिमाशंकर टेकाळे, डॉ. बगले आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी माजी महापौर अलकाताई राठोड, प्रभाग १८ चे नगरसेवक रियाज हुंडेकरी, सेवादलचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, माजी नगरसेवक उपेंद्र ठाकर, भटक्या विमुक्त जाती सेलचे शहराध्यक्ष भारत जाधव, महिला शहर उपाध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, शहर उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब बगले, काँग्रेस प्रवक्ते डॉ. पंकज शरणार्थी, प्रा. प्रमोद मणुरे, मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष अनिल वाघमारे, पत्रकार रमाकांत साळुंखे, सोमनाथ व्हटकर, हरिष गायकवाड, शोभात बोबे, लता गुंडला, बळीराम एडके, सुर्यकांत शिवशरण, नागेश बिडवे, मोहनदास गुमते, युनूस शेख, बाबू जाधव, देवेंद्र सैनसकळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना लसीकरण शिबिरास सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. लोहारे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, शाकीर शेख, रविकांत विटेकर, रेशमा काझी, हिना कौसर. दंत तपासणी यांचे सहकार्य लाभले. तंबाखू व्यसन मुक्ती व जनजागृती शिबिरास सारथी युथ फाऊंडेशन च्या कावेरी बिज्जर्गी, दिपाली वाघमोडे यांचे सहकार्य लाभले. नेत्र तपासणी शिबिरास लायन्स आय हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी सुवर्णा काळे, डॉ. राजशेखर जेऊरे, हर्षा गायकवाड यांनी रुग्णांची तपासणी केली तर पंडित दिनदयाल उपाध्याय दंत महाविद्यालयाचे डॉ. सागर कुंभार, डॉ. गणेश सोनवणे, डॉ. गौरी साठे, डॉ. स्वरणीका, डॉ. सायली सुतार यांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषध दिली. या कोरोना लसीकरण शिबिरात ५९ नागरिकांना लस देण्यात आली तर १८८ रुग्णांची नेत्र तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली तसेच १४१ जणांची मोफत दंत तपासणी करून औषधे देण्यात आली. हा कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन बळीराम एडके यांनी केले. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close