बार्शी नगरपालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी नियुक्त
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी नगर पालिकेचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. 30 डिसेंम्बर रोजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बार्शी नगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत नागरपालिकेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी पाहतील. दरम्यान, शेवटच्या दिवशी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येत मुख्याधिकारी यांचं अभिनंदन केलं. 5 वर्ष एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येत शेवट गोड केला.
0 Comments