कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 31, 2021

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त

 कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त


                                                    


पुणे (कटूसत्य वृत्त):- कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या ठिकाणी बंदोबस्तासाठी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, १३ सहायक पोलिस आयुक्त, ५३ पोलिस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि १९५० पोलिस कर्मचारी राहणार आहेत. तसेच, ७०० होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्या, दहा बॉम्ब शोधक व नाशक विभागाची पथके, शिघ्र कृती दलाच्या सहा कंपन्या, दंगल विरोधी ५ पथके तैनात राहणार आहेत.
यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयास ठाणे, नवी मुंबई, पालघर, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), राज्य महामार्ग, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, पुणे व मुंबई रेल्वे, नाशिक येथून पोलिस मनुष्यबळ देण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages