४६१२ पदांच्या आकृतिबंधास मान्यता; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पाठवुराव्यास यश
आ. प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी कर्मचाऱ्यांना मिळवून दिला न्याय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने राज्याच्या नगरविकास खात्याने नव्या आकृतीबंधला मंजुरी दिल्याने सो.म. न. पालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त पी. शिवशंकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनचे अध्यक्ष कामगार नेते सदाफुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकास खाते मंत्री, यांच्याकडे आकृतीबंध मंजूर होणे विषयी महामानव ट्रेड युनियनच्या माध्यमातून योग्य पाठपुरावा व निवेदने पत्र दिली असताअखेर आमदार प्रणितीताई शिंदे यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आकृती बंद विषयी मंजूर करून रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले सांगितले .यावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून अखेर कर्मचाऱ्यांना आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल अध्यक्ष सदाफुले यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक गटनेते चेतन नरोटे यांनीसुद्धा युनियनच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.
सोलापूर महापालिकेने डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने महापालिकेचा आकृतिबंद ४ हजार ६१२ इतक्या पदांचा मंजूर केला आहे. एकूण मंजूर पदे ५४३४ होती. त्यातील मनपाच्या समितीने शिफारस केलेली व अनावश्यक असलेली १२७९ पदे रद्द करण्यास शासनाने मान्यता दिली. वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार राहणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंगळवारी आदेश जारी केला आहे. महापालिकेने वेळोवळी आकृतिबंध तयार करून अधिनियमाच्या कलम ३५ मधील तरतुदीनुसार सर्वसाधारण सभेसमोर सादर केला होता. १५ डिसेंबर २०२० च्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. आयुक्त सदस्य होते. समितीने समितीची १३ जुलै २०२१ रोजी अंतिम बैठक झाली. त्यात ५४१८ पदे मंजूर असल्याचे निदर्शनास आणले होते.११ पदेउपलब्ध झाली होती. समितीने १२७९ पदे रद्द करण्याची शिफारस केली. त्यामुळे आकृतिबंधासाठी ४१५५ पदांचा विचार करत त्यात ५५१ वाढीव पदे मागितलीगेली.शासनाने आढावा घेऊन अनावश्यक १४ पदे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंतिमतः ४६१२ पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी युनियनचे उपाध्यक्ष बी.टी.जाधव,अरुण मेत्रे,पिंटू जेटीथोर, लक्ष्मण मुरटे, अलीम पठाण, राम चंदनशिवे, राजेंद्र कोरे ,डॉक्टर योगेश पलल्लू, संतोष कांबळे,दिनेश बनसोडे, सतिश गायकवाड ,हरिदास वनजाळे,मिथुन बनसोडे,सुनील शिंदे ,शिवराज शिंदे, संतोष गायकवाड, दीपक राठोड युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या आकृतीबंधसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचा दोन वर्षापासून महापालिकेच्या शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. या कामात महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त पी शिवशंकर यांचे मोठे सहकार्य लाभले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिव स्मारक येथे 24 ऑक्टोबरला भव्य कामगार मेळावा घेऊन आकृतिबंध हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिले. आता 06/04/1995 नंतरच्या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून मोठा लढा उभा करणार.
-अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले
0 Comments