Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यातील भुमिअभिलेख कार्यालयात लाच मागणारे बाळासाहेब केदार एसीबीच्या जाळ्यात

 सांगोल्यातील भुमिअभिलेख कार्यालयात लाच मागणारे बाळासाहेब केदार एसीबीच्या जाळ्यात


सांगोला (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील नेहमीच चर्चेमध्ये असलेले व वादग्रस्त कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख आहे या कार्यालयाच्या अनेक तक्रारी आहेत या कार्यालयामध्ये झिरो कर्मचाऱ्याचा सुळसुळाट नेहमीच पहावयास मिळत आहे शासनाची महत्त्वाची कागदपत्रे तसेच मालमत्ता धारकांची कागदपत्रे यांची नक्कल या कार्यालयामध्ये मिळत असते परंतु या या कार्यालयातील झिरो कर्मचारी शासकीय दप्तर हातामध्ये घेऊन पाहिजेत अशा पद्धतीने खाडाखोड बेकायदेशीरपणे दुरुस्ती करत असतात म्हणून या कार्यालयांमध्ये नेहमी मालमत्ताधारकांनी तक्रारी केल्या आहेत अशा पद्धतीच्या बातम्या देखील वृत्तपत्र व न्युज चॅनलच्या माध्यमातून आलेल्या आहेत.
              गायगव्हाण येथील हॉटेल व्यवसायिक   तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात धाव घेऊन....... तक्रार दिली. तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून त्यांचे मौजे गायगव्हाण येथील गट क्रमांक 41 मधील 32 आर जमिनीची मोजणी होऊन नकाशा मिळवून देणे करता उपअधीक्षक भुमिअभिलेख येथे काम करीत असलेले खाजगी इसम बाळासाहेब एकनाथ केदार राहणार वासुद तालुका सांगोला यांनी भूमी अभिलेख कार्यालय सांगोला येथील उपाधिक्षक मॅडम हे त्यांच्या चांगल्या परिचयाचे असून त्यामुळे आरोपी हे मोजणी नकाशा देण्याचे काम करीत असल्याचे भासवून सदर चा नकाशा देण्याकरता तक्रारदार यांना 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारल्याने यातील आरोपी यांना चौकशी कामे ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे भ्रष्टाचारा संबंधित काही माहिती असल्यास सागर लाच मागणाऱ्या लोकसेवक का बद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे संपर्कासाठी पत्ता पोलीस उपाधिक्षक अँटी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदरची कारवाई श्री उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार अर्चना स्वामी प्रमोद पकाले गजानन कीनगी नेम एसीबी सोलापुर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments