Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना क्रिकेट स्पर्धांमुळे संधी - खा.रणजितसिंह निंबाळकर

 ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना क्रिकेट स्पर्धांमुळे संधी - खा.रणजितसिंह निंबाळकर




सांगोला (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देत प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी क्रिकेट स्पर्धांमुळे संधी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी 
शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ आयोजित सांगोला तालुका मर्यादित भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी मांडले.
       सांगोला शहरात चेतनसिंह केदार सावंत मित्रपरिवार सांगोला तालुका व आरसीसी क्रिकेट क्लब शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ आयोजित सांगोला तालुका मर्यादित भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे अडीच लाख रुपयांचे पारितोषिक जिव्हाळा ग्रुप एखतपुर, द्वितीय क्रमांकाचे दीड लाख रुपयांचे पारितोषिक देवा स्पोर्ट्स सांगोला तर तृतीय क्रमांकाचे 75 हजार रुपयांचे पारितोषिक शिवसंग्राम कडलास या टीमने पटकावले.
       या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले कि, ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील. ग्रामीण भागात अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडांगणाची अत्यंत आवश्यकता आहे. ग्रामीण भागात एवढया मोठ्या क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 
      या कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, तात्यासाहेब केदार-सावंत, चंद्रकांत देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, माजी नगराध्यक्ष पी.सी.झपके, तानाजीकाका पाटील,माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, सागर पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे,शिवाजीराव गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार,  इंजि.रमेश जाधव,  नगरसेवक आनंदा माने, सोमनाथ लोखंडे, सुरेश माळी, नाथा जाधव, अनिलनाना खटकाळे, गुंडादादा खटकाळे, अनिल (बंडू) केदार, राजू शिंदे, प्रताप इंगोले, देवांश घुटुकडे, सौदागर केदार,अनिल केदार, विजय राऊत, विष्णुपंत केदार, समाधान पाटील, हरिभाऊ गायकवाड, सचिन शिनगारे, दत्तात्रय जाधव, बाळू पाटील, रणजित कापले, सुरेश चौगुले, मनोज ढोबळे, नवनाथ केदार, संजय केदार, पप्पू पाटील,सोयजीत केदार गणेश केदार,पिनू केदार,सोमा पावर, बाळासाहेब सावंत, राहुल केदार, धीरज पवार आदी उपस्थित होते. 
      या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी किरण चव्हाण, इन्नुस नदाफ, बाळराजे सावंत सर ,श्रीकृष्ण कोळी, सौरभ देशपांडे, जावेद सय्यद, शाम माळी, रणजित गवळी, विनोद काटकर, इकबाल शेख, विवक सोनवणे, अक्षय जाधव, सोमा भडंगे, यश आदलिंगे, आतिश खटके, सागर कोळी, गोविंद जगधने, गौरव अंकुशराव, गणेश चव्हाण, दिनेश जगधने यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments