Hot Posts

6/recent/ticker-posts

अभिषेक कांबळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश; पक्षांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिक पार पाडणार

 अभिषेक कांबळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

पक्षांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिक पार पाडणार



सांगोला (कटूसत्य वृत्त):- महुद बु येथील युवा कार्यकर्ते तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे समर्थक म्हणून परिचित असलेले अभिषेक कांबळे यांनी नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत  टिळक भवन येथे प्रवेश केला.
    डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक चळवळ बळकट करण्यासाठी तसेच
शाहू ,फुले,आंबेडकरांचा विचार व पुरोगामी महाराष्ट्राची क्रांतिकारी चळवळ वाढवण्यासाठी आणि गरीब,उपेक्षित,  शेतकरी,कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाला बळकट करणार आसल्याचे कांबळे यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments