उच्च न्यायालयांनी करमाळ्याचा मनोहर भोंदूबाबाचा जामीन अर्ज फेटाळला
करमाळा (कटूसत्य वृत्त):- येथील येथील बाळूमामा आश्रमाचे संस्थापक मनोहर मामा भोसले याच्याविरुद्ध करमाळा पोलिसांनी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान बार्शी न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयानेही भोसले याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सध्या अपेंडिक्स आजाराने श्री भोसले याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . उंदरगाव येथील आश्रमातील भक्तांची फसवणूक करणे तसेच एका महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात मनोहर भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाली आहे. सुरूवातीला बारामतीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मनोहर भोसले यास अटक केली होती. त्यानंतर करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले यास ताब्यात घेऊन अटक केली. तपासासाठी सात दिवसाची पोलीस कोठडी मिळवली होती. त्यानंतर भोसले यास न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर भोसले यांचे वकील रोहित गायकवाड यांनी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता परंतू तो अर्ज फेटाळला. त्यानंतर भोसलेच्या वतीने उच्च न्यायालयात जामीन साठी अर्ज दाखल केला, पण तो अर्जही फेटाळण्यात आला. त्यामुळे मनोहर भोसले यांस तुरूंगातच रहावे लागले. दरम्यान भोसले यास अपेंडिक्सचा त्रास सुरू झाल्याने , बार्शी येथील न्यायालयाच्या परवानगी ने अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सध्या अकलूजकर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस भोसले यांचा बंदोबस्त करत आहेत. दोषारोपपत्र दाखल झाल्याने श्री . भोसले पुन्हा एकदा बार्शी न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल करेल.
0 Comments