Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरुवर्य बापूसाहेब झपके जन्मशताब्दी निमित्ताने व गुनाई सुमन हरी डेअरी यांचे वतीने मोफत नेत्रतपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन

 गुरुवर्य बापूसाहेब झपके जन्मशताब्दी निमित्ताने 
व गुनाई सुमन हरी डेअरी यांचे वतीने मोफत नेत्रतपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन 







सांगोला  (कटूसत्य वृत्त):- कै. गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष 2021-22 निमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोला व कै. गुनाई सुमन हरी डेअरी आलेगाव, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनाथ मंदिर आलेगाव तालुका सांगोला येथे रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत मोफत नेत्रतपासणी व अल्प दारात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे.  मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया चे उदघाटन गटविकास अधिकारी आनंद लोकरे व सहा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल मा.प्रा.ला.प्रबुद्धचंद्र झपके सर, प्रमुख उपस्थिती सरपंच नंदाबाई दिवसे, उपसरपंच राहुल ढोले, समाज सेवक मा.इंजि. हरिदास कांबळे, चेअरमन सुमन कांबळे उपस्थित राहणार आहेत. सदर मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन अध्यक्ष धनाजी चव्हाण, सचिव उमेश आटपाडीकर, खजिनदार काकासो नरुटे, सर्व सदस्य लायन्स क्लब ऑफ सांगोला तसेच समाजसेवक मा.इंजि. हरिदास कांबळे, चेअरमन सुमन कांबळे व सर्व पदाधिकारी व सदस्य कै. गुनाई सुमन हरी डेअरी आलेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी आलेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.     


                                             

Reactions

Post a Comment

0 Comments