Hot Posts

6/recent/ticker-posts

विधिमंडळात पारित झालेल्या महाराष्ट्र विद्यापीठ विधेयकाचे पडसाद सोलापुरात उमटले

 विधिमंडळात पारित झालेल्या महाराष्ट्र विद्यापीठ विधेयकाचे पडसाद सोलापुरात उमटले



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे बदल करत विधानसभेत कुठलीही चर्चा न करता गोंधळाच्या वातावरणात कायदा  पारित केला. या कायद्याच्या विरोधात अभाविप सोलापूर ने प्रसिद्ध वेब सीरीज मनी हाइस्ट मधल्या चोरांची भूमिका घेऊन आंदोलन केले. या कायद्याच्या माध्यमातून विद्यापीठाची स्वायतत्ता धोक्यात आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केलेला आहे.

         महाराष्ट्रात सर्व विद्यापीठांचे कुलपती या नात्याने मा.कुलगुरू निवडण्याचा अधिकार हा सन्मा.राज्यपाल महोदयांना असतो परंतु या कायद्याच्या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद निर्माण करून राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करून स्वतःचे नियंत्रण विद्यापीठावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.या पारित करण्यात आलेल्या कायद्या च्या विरोधात अभाविप सोलापूर च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात जग प्रसिद्ध वेब सीरीज मनी हाइस्ट मधल्या चोरांचे मुखवटे लावून राज्य सरकार अश्याच पद्धतीने अन्यायकारक मुखवटे लावून विद्यापीठात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते आहे असे दाखवून दिले. अश्या पद्धतीच्या मास्क चा वापर जागतिक राजकारणात अनेक ठिकाणी वापरण्यात येत आहे. आज सोलापूरात सुद्धा अन्यायाच्या विरोधात अभाविप सोलापूरने याचा वापर करून एक आगळी वेगळी भूमिका घेतली. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अत्यंत तीव्रतेने या साठी आंदोलन केले. यावेळी जिल्हा संयोजक दिनेश मठपती,महानगर मंत्री समर्थ दरेकर, सहमंत्री आदित्य मुस्के, उर्वी पटेल, श्रुती बिराजदार, श्रीनिवास गुन्हाल, वैभव मुळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments