Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाचा स्फोट! देशात एकाच दिवसात समोर आले 10,000 रुग्ण

 कोरोनाचा स्फोट! देशात एकाच दिवसात समोर आले 10,000 रुग्ण


राज्यात निर्बंधाबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (कटूसत्य वृत्त):- मागील काही दिवसांत कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. काहीशी आटोक्यात असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता लक्षणीय होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. यावेळी 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण, निर्बंध आणि ओमायक्रॉनवरील उपचारपद्धती अशा साऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (30 डिसंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आणि टास्क फोर्सचे पदाधिकारी यांची दोन तास बैठक झाली. ज्यावेळी कोरोनासंबधी विविध गोष्टींवर चर्चा झाली. कोरोनारुग्णांची वाढती संख्या, ओमाक्रॉनचं संकट, लसीकरण इत्यादींवर चर्चा झाली असून निर्बंध आणि पुढील उपाययोजने संबधित माहिती मुख्यमंत्री येत्या एक-दोन दिवसांतच निर्णय घेऊन सांगतिल असं टोपे म्हणाले. टोपे यांनी नागरिकांना गर्दी अजिबात करु नका असं सांगताना 31 डिसेंबर रोजीही काळजी घ्या असं आवाहन केलं. सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 एवढी आहे. यातच गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. याच वेळी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढताना दिसत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर 10% पेक्षा जास्त आहे. याच वेळी, 14 जिल्हे असे आहेत जेथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10% एवढा आहे. महाराष्ट्रात 9 डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 0.76% एवढा होता, तो आता 2.3% झाला आहे. याचप्रमाणे, बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 1.61% होता, तो वाढून 3.1% झाला आहे. तसेच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 0.1% होता, तो आता 1% झाला आहे.
देशात 961 रुग्ण ओमायक्रॉन बाधित -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 121 देशांमध्ये एका महिन्यात 3,30,000 हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास, येथे आतापर्यंत 961 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यांपैकी 320 रुग्ण बरेही झाले आहेत. दिल्लीत ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे आतापर्यंत 263 प्रकरणे आढळून आली आहेत. पण यांपैकी 57 रुग्ण बरेही झाले आहेत.
'शाळा तूर्तास बंद होणार नाहीत'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच 15 ते 18 वर्षांतील मुलांच्या लसीकरण होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर या वयोगटातील मुले शाळा आणि महाविद्यालयात जात असून त्यामुळे शाळा, महविद्यालय बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत बोलताना टोपे यांनी सध्यातरी शाळा बंद होणार नसून लसीकरण शाळेत न घेता मुलांना गटा-गटाने लसीकरणासाठी नेलं जाईल, यावेळी सर्व महत्त्वाची काळजी घेतली जाईल. असंही टोपे म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments