सोलापूरातील 23 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनात सामावून घेण्याच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचा-यांनी मागील 55 दिवसांपासून संप पुकारला आहे. दरम्यान, सोलापूर विभागाचा विचार केला असता, आत्तापर्यंत 555 कर्मचारी कामावर परतले असले तरीही अजून दोन हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. शासनाने त्यांना कामावर येण्याबाबत सांगितले मात्र, अजूनही कामावर न आलेल्या सोलापूर आगारातील 23 बुधवारी ता. 29 रोजी बडतर्फीची नोटीस बजावली असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या कारवाईमुळे संप अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हयात एसटी महामंडळात चालक, वाहक, यांत्रिक व इतर पदांवर जवळपास 3900 कर्मचारी आहेत. दरम्यान, सुरुवातीला सर्वच कर्मचारी संपात सहीागी होते. मात्र, त्यांनतर टप्पयाटप्प्याने काही कम्रचारी कामावर परतले. जिलहयात कामावर परतजणा-याप कर्मचा-यांची संख्या 555 इतकी आहे. तसचे यापूर्वी शासन आदेशावरुन एसटीच्या 377 कर्मचा-यांना निलंबनाच्या कारवाई नंतरही एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत.
अजूनही ते संपावर आहेत. शासनात सामावून घेण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही कामावर येणारच नाही, अशी आक्रमक भूमिका कर्मचा-यांनी घेतली आहे. परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी कर्मचा-यांना कामावर परत या, अन्यथा कठोर कारवाई करणार, असा इशारा दिला होता. बुधवारी सोलापूर आगारातील संपकरी एसटी कर्मचा-यांवर बडतर्फीच्या नोटीस देण्याची कारवाई झाली आहे.
* आकडे बोलतात
एकूण सुरु बस : 106
हजर चालक : 38
हजर वाहक : 48
प्रशासकीय कर्मचारी : 260
कार्यशाळेतील कर्मचारी : 209
निलंबित कर्मचारी : 377
सेवासमाप्ती : 28
बडतर्फीची नोटीस : 23
0 Comments