Ads

Ads Area

अकलूज-सांगोला राष्ट्रीय महामार्ग करण्यासह पुलांची पुनर्बांधणी करण्याची मागणी

 अकलूज-सांगोला राष्ट्रीय महामार्ग करण्यासह पुलांची पुनर्बांधणी करण्याची मागणी




भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

सांगोला (कटूसत्य वृत्त):- अकलूज-वेळापूर, वेळापूर-महुद-सांगोला या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग स्तरावर उन्नतीकरण करावे तसेच महूद-सांगोला रोड एनएच 965 जी वरील पुलांना तात्काळ मंजुरी द्यावी. तसेच रस्ते व पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.सोमवारी पंढरपूर येथे केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व पुलांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात चर्चा केली. पाटस- बारामती- इंदापूर-अकलूज वेळापूर-सांगोला-जत या रस्त्याचे एनएच 965 जी पर्यंत अपग्रेड केले आहे. मात्र अकलूज-वेळापूर हा राज्य महामार्ग असल्याने रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अपग्रेड करणे आवश्यक आहे.पाटस-बारामती-इंदापूर-अकलूज-बोंडले-वेळापूर-सांगोला-जत रस्ता मंत्रालयाने एनएच 965 जी मध्ये अपग्रेड केला होता. पाटस ते बोंडले हा मार्ग संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणून ओळखला जात असून 4 लेनिंगसाठी मंजूर आहे. सांगोला-जत रस्ता एनएच (पीडब्लूडी) सोलापूरद्वारे दोन लेन व काँक्रीट रस्ता म्हणून विकसित केला आहे. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघातून जाणारा उर्वरित रस्ता 7 मी. रुंदीचा 48 किमीचा रस्ता जडवाहतुकीमुळे खराब आणि खराब झाला असल्याने वारंवार अपघात होत आहेत. तसेच या रस्त्यावरील पूल अरुंद आहेत. त्यामुळे या रस्त्याचे महामार्गात रूपांतर करून अपग्रेड करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अतिरिक्त वार्षिक योजनेंतर्गत वरील रस्ता मंजूर करावा. तसेच पाटस-बारामती- इंदापूर-अकलूज-बोंडले-वेळापूर-सांगोला-जत रस्ता मंत्रालयाने एनएच 965 वर श्रेणी सुधारित केला. या रस्त्यावरील महुद गावाजवळील पूल, चिंचोली तलावाजवळील पूल, वाकी गावाजवळील पूल, एनआरबीसी कालव्याजवळ अरुंद आणि नुकसान झाले आहे. त्यांची प्राधान्याने पुनर्बांधणी पकरण्याची आवश्यकता आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अतिरिक्त वार्षिक योजनेअंतर्गत वरील रस्ते व पुलांच्या पुनर्बांधणीला मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close