Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आपल्यातील कर्तव्यता जपा दोन्ही तालुक्यातील वाळूचोरी रोखण्यास हात बळकट होतील का ?

प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आपल्यातील कर्तव्यता जपा दोन्ही तालुक्यातील वाळूचोरी रोखण्यास हात बळकट होतील का ?



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याचे नूतन प्रांताधिकारी म्हणून  आप्पासाहेब समिंदर यांनी काही महिन्याभरापूर्वी कारभार हाती घेतला आहे. नव्याचे नऊ दिवस म्हणून सर्वसामान्य नागरिक सुखावला पण याच कार्यालयातील पेंडन्सी कामाने मात्र सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला.नव्याने आलेले प्रांताधिकारी साहेब मात्र आपल्याच तोऱ्यात आणि भ्रमात असल्याचे चित्र जनमानसात उमटत आहे,पण साहेब सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक नदीकाठाच्या गावातून खुलेआम वाळू तस्करी होताना आपले प्रशासन मात्र "'तेरी भी चूप मेरी भी चूप" च्या भूमिकेत आहे, आणि आपण मात्र कामात गतिमानता,पारदर्शकता,सुसूत्रता,झिरो पेंडन्सी, आदि गोंडसवाण्या शब्दांचा वापर करीत आहे,हे आपल्या सारख्या जनसेवकाला शोभत नसल्याची भावना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी खाजगीत बोलून दाखवली आहे.आप्पासाहेब समिंदर साहेब आपली ओळख कडक,शिस्तप्रिय,जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा एक डॅशिंग अधिकारी म्हणून आहे,पण आपल्या कार्यालयाकडून साध्या आणि नियमानुसार होत असलेल्या कामाला जर एक एक महिना लागत असेल तर नेमके कागदी घोडे अडले कुठे आणि यामुळे टेबलावर आणि टेबलाखालच्या कार्यपद्धतीवर तालुक्यातील नागरिक नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. 

                   अनेक कामाच्या संदर्भात आपल्याकडे स्थानिक नगरसेवक,राजकीय पदाधिकारी,चळवळीतील कार्यकर्ते,पत्रकार आदि मान्यवर भेटण्यासाठी येत असतात,पण आपल्यातील लोकसेवक मात्र त्यांना "बघू,करू,पाहतो, तपासून पाहतो,सांगतो,या शब्दांच्या पलीकडे जावून कार्यवाही करताना दिसून येत नाही, म्हणून आपली कार्य पद्धतीत सुधारणा करावी,अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.खुलेआम वाळू चोरीची वाहने जात असताना नदीकाठच्या गावातील सुज्ञ नागरिकांनी आपणांस लावला तर आपल्याकडून फोन रिसिव्ह केला जात नाहीत,त्यामुळे कारवाई तर होतच नाही पण वाळू माफियांचे फावते आहे,नुकताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगोला तालुक्याचा दौरा केला ,याच दौऱ्यात प्रांताधिकारी यांना पेंडन्सी कामाची पूर्तता लवकर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.पण प्रांताधिकारी साहेबांनी हो करतो म्हणून सांगितले, पण रस्ते केसेस,अकृषिकचे आदेश मात्र जैसे थे, असल्याचे चित्र दिसून येत आहे.

                आपल्या कार्यालयाकडून आणि आपल्याकडून जनसेवक म्हणून लोकांच्या समस्या,अडचणी सोडवण्याची जबाबदारी आपली आहे,येणाऱ्या काळात तरी त्या नियमाप्रमाणे आपण सोडवाल अशीच माफक अपेक्षा या निमित्ताने दोन्ही तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत, नाही तर येत्या काळात लोक आपणाविरोधात जनआंदोलन उभे करतील यात शंका नाही.


Reactions

Post a Comment

0 Comments