माढा येथे शुक्रवारी समोर बैलगाडी मोर्चा
माढा (कटूसत्य वृत्त):- महावितरण कंपनीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कृषी पंपाच्या वीज वसुली मोहिमेला मुंबई च्या वरिष्ठ कार्यालयाकडुन गुरुवारी स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे माढा शहरात शुक्रवारी २९ ऑक्टोबर ला शिवसेना शहराध्यक्ष शंभु साठे यांचे तालुक्यातील शेतकर्यासमवेत वीज वसुली विरोधात होणारा बैलगाडी मोर्चा,ठिय्या आंदोलन रद्द करण्यात आले आहे.या शेतकर्यांच्या प्रश्नी माढा शिवसेनेने आक्रमकता दर्शवत शंभु साठे,मुन्ना साठे यांनी शेतकर्याची व्यथा महावितरणच्या अधिकार्या समोर मांडुन शुक्रवारी माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावितरण कार्यालया समोर बैलगाडी मोर्चा,ठिय्या आंदोलनाचे नियोजन केले होते.मात्र कृषी पंप वीज वसुली मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याने निर्णयाचे शेतकर्या मधुन स्वागत होत आहे. (कोट) अगोदरच अतिवृष्टी मुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठं नुकसान झाले.फळबागांना ही फटका बसला आहे.त्यातच उरलेली पिके देखील वीज कनेक्शन तोडल्याने जळुन जाऊ लागली होती.स्थगिती देण्यात आल्याने शेतकरी आनंदुन गेला आहे.सुलतानी कारवाई पुन्हा सुरु झाल्यास शेतकर्याच्या पाठीशी उभा राहुन आवाज उठवु-शंभु साठे,शिवसेना शहराध्यक्ष माढा.
0 Comments