आढेगावपाटी ते गारअकोले रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्याचे लेखी पत्र देत कार्यकारी अभियंत्याच्या मध्यस्थीने ऊपोषण स्थगित..
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील जिप्रमा १२८ आढेगावपाटी ते गारअकोले रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब कळसाईत यांनी आमरण ऊपोषण सुरू केले होते.सदर ऊपोषणस्थळी कार्यकारी अभियंता व्हि एच मोरे यांनी भेट देत रस्त्याची समक्ष पाहणी केली.सदर रस्त्यास आॅईल मिश्रीत डांबर वापरल्यामुळे संपूर्ण रस्ता खचला गेल्याचे मान्य केले.ऊपोषणस्थळी टाकळी,वडोली,चांदज,गारअकोले,आढे गाव येथील ग्रामस्थांनी भेटी देऊन रस्ता पुन्हा डांबरीकरण करावा अशी मागणी करत पाठिंबा दर्शविला.यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील,शेकाप नेते बाळासाहेब पाटील यांच्या मध्यस्थीने कार्यकारी अभियंता मोरे यांच्यात सविस्तर चर्चा होऊन सदर रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्याची मागणी मान्य करून लेखी पत्र दिले.सदर रस्त्याची पुर्नदेखभाल व दुरूस्ती तीन वर्षाची ठेकेदाराने करावयाची आहे असेही मोरे यांनी सांगितले.यावेळी कार्यकारी अभियंता व्हि एच मोरे यांनी सदर रस्ता नवीन डांबरीकरण एप्रिल २०२२ अखेरपर्यंत करून देऊ अशा आशयाचे लेखी पत्र ऊपोषण कर्ते दादासाहेब कळसाईत यांना दिले.ऊपोषण कर्ते व कोढांरभागातील सर्व ग्रामस्थांची मागणी मंजुर झाल्यावरून दादासाहेब कळसाईत यांनी आमरण ऊपोषण आंदोलन स्थगित केले.यावेळी ऊपविभागीय अभियंता एन ए नायकवाडी,कनिष्ठ अभियंता एस एस हेडगिरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व पोलीस कर्मचारी ऊपस्थित होते.या आंदोलनास जि.प सदस्स प्रतिनीधी शिवाजी पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील,निवृत्ती तांबवे,बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन बागल,रामदास खराडे,विठ्ठल मस्के,रामभाऊ टकले आदीजनांनी पाठिंबा दिला होता.या वेळी रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील,शेकापचे बाळासाहेब पाटील,ऊपसभापती धनाजी जवळगे, पिपल्स पार्टी आॅफ ईंडियाचे संजय सोनवणे,नारायण गायकवाड,निवृत्ती तांबवे,रामभाऊ टकले,अजित घाडगे,पिंटु लेंगरे,विष्णु बिचकुले,सतिश काळे,चांदज सरपंच बळीराम हेगडकर, बापू हेगडकर, सोमनाथ काळे पिंटू लेंगरे,पिंटु पाटील, अर्जुन चव्हाण, ज्योतीराम घाडगे, शिवाजी पाटील,अॅड शंकर राजमाने,नारायण गायकवाड,सूरज चव्हाण, योगेश हुलगे, नवनाथ कुंभार, विष्णू कुंभार,गहीनीनाथ कुंभार,हनुमंत तोडकर,सचिन घाडगे,तुकाराम भोसले,हरिदास माने,संजय सगर, राजेंद्र राजमाने,सुनिल माने,माऊली मारकड आदीजण ऊपस्थित होते. *चौकट*- खासदार रणजितसिंह निंबाळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी फोनवरून रस्त्याच्या निकृष्ठतेबद्दल कार्यकारी अभियंता व्हि एच मोरे यांना रस्ता प्रत्यक्ष पहाणी करून आंदोलनकर्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते.त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून नवीन डांबरीकरण करणार असल्याचे लेखी पत्र दिले.पाठपुराव्यामुळे आढेगावपाटी ते गारअकोलेपर्यंतचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. प्रा सुहास पाटील.सदस्स-जिल्हा विकास सनियंत्रण समिती सोलापूर.
0 Comments