Hot Posts

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली बाळराजे पाटील यांनी भेट

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली बाळराजे पाटील यांनी भेट


मोहोळ तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात
बाळराजे पाटील यांचा झंझावाती पाठपुरावा


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या दोन महिन्यापासून राष्ट्रवादीचे युवा नेते तथा लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील हे मोहोळ तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात सातत्याने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या सहकार्याने बाळराजे पाटील यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत विकास कामे मार्गी लावण्यास प्रारंभ केला आहे.
दोन दिवसापूर्वी मुंबई येथे देवगिरी निवासस्थानी  उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य तथा लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजितदादांशी बाळराजे पाटील यांनी चर्चा करून तालुक्यातील विकास कामांचे प्रश्न मांडले. यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष प्रकाशभाऊ चवरे , रामचंद्र शिरसागर,शशीकांत पाटील दत्तात्रय पवार इत्यादीसह राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राज्याचे  पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांची भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नासंदर्भात मंत्रीमहोदय बनसोडे यांच्याशी बाळराजे पाटील यांनी चर्चा केली. 



राज्याचे आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री ना.राजेश टोपे यांची भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील मंजूर असलेल्या मुंढेवाडी,कुरुणवाडी(आष्टी),बोपले,अर्जुंनसोंड,खवणी येथील आरोग्य उपकेंद्रास निधी मंजूर करण्याची मागणी बाळराजे यांनी केली. बाळराजे पाटील यांनी त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांचीही भेट घेऊन त्यांना तालुक्यातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा विशद केला. यावेळी युवा नेत्यांमध्ये विविध इतर कौटुंबिक विषयावर देखील चर्चा झाली यावेळी पार्थदादा पवार यांनी अनगरकर पाटील परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्यविषयी अस्थेवाईकपणे विचारपूस केली.
मोहोळ तालुक्यातील आणि मोहोळ मतदारसंघातील विविध विकास कामासाठी माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून महाविकासआघाडी सरकारने साडेतीनशे कोटी पेक्षा जास्त भरीव निधी दिला आहे. त्यामधून रस्ते, पाणी, आरोग्य, वीज,स्वच्छता इत्यादी विभागांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शिवाय शासकीय इमारतींसाठीच्या निधीचा प्रश्न देखील आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने सोडवला आहे. या पुढील काळातही मोहोळ तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री  ना.अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर मंत्रीमहोदयांनी आपणाला दिला आहे.मोहोळ मतदारसंघ हा या पुढील काळात सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विकसित मतदारसंघ म्हणून नक्कीच नावारूपास येईल.
बाळराजे पाटील 
चेअरमन लोकनेते शुगर


Reactions

Post a Comment

0 Comments