Hot Posts

6/recent/ticker-posts

पोषण महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे संपन्न

 पोषण महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे संपन्न 



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षच्या निमित्ताने पोषण वाटिका महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे संपन्न झाला. याप्रसंगी केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग द्वारे करण्यात आले. 
पोषण वाटिकेच्या माध्यमातून कौटुंबिक पोषण सुरक्षा मोहोळ महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर इफको, महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ व आत्मा, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उदघाटन सभापती रत्नमाला पोतदार यांचे हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ चे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे हे होते. जिल्हा समन्वय अधिकारी
 सोमनाथ लामगुंडे, श्रेयस मोहिते, सुहास ढवळे, योगेश बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ व इफको यांच्या सहयोगाने महिला शेतकरी, शेतकरी व ग्रामीण युवक, युवती यांना “पोषण परसबाग बियाणे किट”, रोपे व फळझाडांचे वितरण करण्यात आले.
डॉ. तानाजी वळकुंडे यांनी शेतकरी, महिला शेतकरी व ग्रामीण युवती यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत पोषण अभियान अंतर्गत सक्रिय सहभाग घेवून पोषण परसबागच्या माध्यमातून कौटुंबिक पोषण सुरक्षा साध्य करावी असे नमूद केले. तसेच कृषि विज्ञान केंद्रा मार्फत दरवर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जातो. यामध्ये विशेषत: महिला व बालकांकरिता विविध पोषण विषयक जागृकता कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे नमूद केले.
सभापती रत्नमाला पोतदार यांच्यासह तांत्रिक संत्रांत डॉ. शरद जाधव, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) हे पौष्टिक तृणधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयावर, दिनेश क्षिरसागर, विषय विशेषज्ञ, (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) हे पौष्टिक तृणधान्यातील पोषण तत्वे, मानवी आहारातील महत्व व पोषण वाटिका आणि डॉ. विशाल वैरागर, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) हे वृक्षारोपण आणि ग्रामीण उपजीविका, दिनेश क्षीरसागर, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन मार्गदर्शन केले. 
यावेळी डॉ. विशाल वैरागर, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार), डॉ. शरद जाधव, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या), डॉ. पंकज मडावी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), डॉ. सूरज मिसाळ, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र), श्री. सुयोग ठाकरे, कार्यक्रम सहाय्यक (संगणक), तुषार अहिरे, कार्यक्रम सहाय्यक  रवी साखरे, ज्ञानेश्वर तांदळे,  अरुण गांगोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments