Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वेस्थानक येथे लोहमार्ग पोलिसांचे फेरीवाल्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा

 रेल्वेस्थानक येथे लोहमार्ग पोलिसांचे फेरीवाल्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-डोंबिवली, पुणे आणि इतर ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना चाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरलोहमार्ग पोलिसांनी दक्षता घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यासाठी मंगळवारी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी चाइल्ड हेल्प डेस्कचे सहकार्य घेण्यात आले. सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमोलगवळी यांनी मार्गदर्शन केले. महिलांविषयी घडणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानक परिसरात काय काय दक्षता घेता येईल याचा ऊहापोह केला. यावेळी चाइल्ड हेल्प डेस्कच्या प्रतिनिधींनी महिलांविषयीचे लैंगिक अपराध, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, देह व्यापार आणि बालकांची तस्करी प्रतिबंध, एखादी
अल्पवयीन मुलगी सापडल्यास तिच्याबाबत मदतीचा हात कसा पुढे करायचा, वाईट भावनेला आवर
कसा घालायचा, पोलिसांची मदतकशी घ्यायची आणि उपाययोजना अशा रीतीने करायच्या आदी
विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस स्थानकात उपस्थित महिला कर्मचारी, तिकीट तपासणीस विभागातील महिला कर्मचारी, सफाई कर्मचारी, स्थानक परिसरात व्यवसाय करणारे रिक्षाचालक आणि प्रवासी उपस्थित होते. उपअधीक्षक चौघुले, रेल्वे स्थानक व्यवस्थापक गजानन मीना उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस यांनी परिश्रम घेतले. 

Reactions

Post a Comment

0 Comments