बेंदओढ्यावरील पुलाची दुरावस्था ठरतेय अपघाताला आमंत्रण

कुर्डुवाडीकर त्रासाने झाले बेजार,सा.बां.विभागाने केले हात वर
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- तब्बल गेल्या दोन वर्षांपासून कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील राज्य परिवहन महामंडळ बस डेपोजवळील बेंद ओढ्यावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे कित्येकदा तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून देखील फारसा फरक पडलेला दिसत नाही त्याउलट डागडुजी केलेल्या ठिकाणीच भल्या मोठ्या खड्ड्याचा विस्तार पाहण्यास मिळत आहे तसेच त्या ठिकाणच्या रस्त्याची चाळण झाल्याने त्याचे धुळीत रूपांतर होऊन दररोज छोट्या मोठ्या अपघातास दावत मिळण्याबरोबर वाहतुकीची कोंडी होताना दिसते.
कुर्डुवाडी शहरातून बार्शी,करमाळा टेंभुर्णी,पंढरपूर च्या दिशेने जाणारी वाहतूक भली मोठी आहे याच रस्त्यावरून परंडयासह आसपासच्या ग्रामीण भागात येण्या-जाण्यासाठी येथूनच बसेस धावताना दिसतात ओढ्या पलीकडील भागात राहणाऱ्या लोक वसाहतीतील नागरिकांना बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,बँका ,नगरपरिषद,पंचायत समिती,दवाखाने,बाजार समितीसह अन्य शासकीय निमशासकीय कार्यालयात जाण्यासाठी हा नजीकचा मार्ग असून या ठिकानाहून असंख्य दळणवळण रोजंदारी पहावयास मिळते.
सायंकाळ सात नंतर खेडे गावात जाणाऱ्याची संख्याही तितकीच मोठी असते पहाटेच्या वेळेस वयस्कर लोक बाह्यमार्गावर फिरायला जातात परंतु या रस्त्यावर बेसुमार खड्ड्याचा विळखा असल्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा तीव्र संताप व्यक्त होत आहे ऐन पावसाळ्यामध्ये खड्यात पाणी साचते व त्याठिकाणचा परिसर दुर्गंधीने व्यापला जातो त्यामुळे वाहन चालकाला कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.
पडलेल्या खड्डयामुळे ओढ्यावरील रस्त्यावरून पैदल अथवा वाहन चालकांना रस्ता पार करण्यासाठी दमछाक होते रात्रीच्या वेळेस खड्डे न दिसल्याने फार नाजुक अपघातास सामोरे जावे लागते संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्त करून पुलाची उंची वाढवावी अन्यथा लोकांच्या जीवितास बरेवाईट झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार राहील. राजेंद्र साळवे ,(माजी नगरसेवक,कुर्डुवाडी) रस्त्याने येताजाता पडलेल्या खोलगट खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत धुळीच्या त्रासाने अनेकांना श्वासनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्याच्या दिवसात येथून पुढे जाणे जिकरीचे झाले आहे.
राहुल गोरे (नागरिक,गोरे वस्ती) सदरचा रस्ता एम.एस.आर.डी.सी कडे २०१७ साली वर्ग करण्यात आला आहे.एन.ए.नाईकवाडी (उपअभियंता सा.बां.वि,कुर्डुवाडी)
0 Comments