सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोल्हापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून मेडशिंगी(ता.सांगोला) गावचे सुपुत्र शंकरराव जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. जाधव यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. जाधव हे याआधी सांगली जिल्ह्यात भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. जाधव महसूल विभागातील सर्वात कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. शंकरराव जाधव यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात राजशिष्टाचार व खनिकर्म विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यातही त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायगड जिल्ह्यात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
0 Comments