महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला तालुकाध्यक्षपदी अनिल केदार तर शेतकरी सेना जिल्हाध्यक्षपदी भालचंद्र गोडसे यांची निवड

सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला शहर व तालुक्यातील विविध पदांच्या निवडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राज ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, म न सहकार सेना , शॉडो कॅबिनेट मंत्री- सहकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी अनिल केदार तर शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष पदी भालचंद्र गोडसे यांची निवड करण्यात आली तसेच विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते, शहराध्यक्ष अजिंक्य तोडकरी ,तालुका प्रसिद्ध प्रमुख खंडू इंगोले, तालुका संघटक विशाल गोडसे ,सहकार सेना तालुका अध्यक्ष रामचंद्र सरगर, उपतालुका अध्यक्ष रमेश नरके, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनसोडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ओंकार शिंदे, व विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष ओंकार खडतरे यांची निवड करण्यात आलेले आहे
सदर कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर, तालुका आ अनिल केदार ,विशाल गोडसे , अक्षय विभुते, अजिंक्य तोडकरी , ,भालचंद्र गोडसे ,अविनाश बनसोडे ,ओंकार शिंदे रमेश नरके, विष्णू खडतरे ,व सांगोला तालुक्यातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments