Hot Posts

6/recent/ticker-posts

वीज कनेक्शन लवकर सुरू करावीत नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल-संजय पाटील भिमानगरकर

 वीज कनेक्शन लवकर सुरू करावीत नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल-संजय पाटील भिमानगरकर 



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टोमॅटोचे कॅरेट पाच रुपये ढोबळी मिरची दहा किलोची बॅग दहा रूपयाने जात आहे.भेंडी,काकडी, कोबी,गवार या भुसार पिकांचा खर्चही निघत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना खताच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत.पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर रोज वाढत आहे. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.अशातच महावितरणने वीज कनेक्शन बंद केली आहेत यामुळे बळीराजा चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांना त्रास दिला तर महावितरणच्या विरोधात आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असे मा. कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले.सगळ्या शेतीमालाचे भाव ढासळलेले आहेत शेतकरी अडचणीत असताना अशावेळी वीज मंडळाने शेतकऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित होते परंतु कालव्याला पाणी सुटून आठ दिवस झाले आहेत आणि वीजपुरवठा खंडित केला आहे.जनावरानां पाणी पाजण्यासाठी सुध्दा लाईट दिली जात नाही.शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये अन्यथा याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे होतील असेही मा. माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले.उजनी धरणाच्या सर्व सिंचन योजना सुरू असताना वीज पुरवठा बंद ठेवणे कितपत योग्य आहे याचा महावितरणने विचार करावा संजय पाटील भिमानगरकर


Reactions

Post a Comment

0 Comments