Hot Posts

6/recent/ticker-posts

हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

 हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना





 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- हिप्परगा तलाव सोलापूर शहराच्या नजीक असल्याने याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळतात. उजनी धरणाप्रमाणे याठिकाणी सुशोभीकरण करून पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित कराअशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.लाभक्षेत्र विकास प्राधिकरणसामाजिक वनीकरण, वन विभाग आणि मेतन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी  भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरवन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटीललाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळेउपविभागीय अभियंता प्रकाश बाबाशाखा अभियंता शिरीष जाधवउत्तर सोलापूरचे तहसीलदार जयवंत पाटीलवनक्षेत्रपाल जयश्री पवारतुकाराम जाधवरमेतन फाऊंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतनज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी आदी उपस्थित होते.`हिप्परगा तलाव येथे अडीच एकर परिसरात सुशोभिकरण करून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हा तलाव पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. इथले विश्रामगृह विकसित करून बगीचा तयार करा. शेतकऱ्यांच्या अडचणी, नुकसान होणार नाहीयाची काळजी घेण्याच्या सूचनाही भरणे यांनी संबंधितांना दिल्या.यावेळी भरणे यांच्या हस्ते विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments