Hot Posts

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा

 


कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी
-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

  कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच गेले पाहिजेत

 नियमभंग करणा-यांविरुद्ध प्रशासकीय यंत्रणांनी अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश

 पुणे जिल्हयाने कोविड लसीकरणाचा 50 लाखाचा टप्पा ओलांडल्याबाबत समाधान

 पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत दक्षता घ्या

 

       पुणे,(कटूसत्य वृत्त):- कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणा-यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी नियमभंग करणा-यांविरुद्ध अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यासोबतच मास्कचा वापरसुरक्षित अंतर व इतर दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावेअसे आवाहनही त्यांनी केले.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरेखासदार सुप्रिया सुळेखासदार गिरीष बापटआमदार ॲड. अशोक पवारआमदार माधुरी मिसाळआमदार सुनिल शेळकेआमदार चेतन तुपेआमदार सिध्दार्थ शिरोळेआ. अतुल बेणकेआ.सुनिल कांबळे,आ. दिलीप मोहितेआ.राहुल कुल तसेच यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगमपुणे मनपा आयुक्त विक्रम कुमारपिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटीलजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखमनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशजिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुखजि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादपिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणेआरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखेटास्क फोर्सचे डॉ. दिलीप कदम आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

            पुणे जिल्हयाने कोविड लसिकरणाचा पन्नास लाखाचा टप्पा पार केला याबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे. निष्कारण घराबाहेर पडणा-या व्यक्तीमास्क न वापरणारेसुरक्षित अंतराचे पालन न करणारे यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजेअशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. पोलीस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे.  पुणे जिल्हयात  मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र नागरिकांनी मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी सॅनिटायझरसुरक्षित अंतर याबाबतही दक्षता घ्यावीच लागणार आहेत्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावेकोणत्याही परिस्थितीत नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमांच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नयेअसे स्पष्ट निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश

            जिल्हयातील पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाबाबच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावीकोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच  पाहीजेतसर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचेच आहे असे त्यांनी सांगितले.

        यावेळी खासदार सुप्रिया सुळेखासदार गिरीष बापटआमदार ॲड. अशोक पवारआमदार माधुरी मिसाळआमदार सुनिल शेळकेआमदार चेतन तुपेआमदार सिध्दार्थ शिरोळेआ. अतुल बेणकेआ.सुनिल कांबळेआ. दिलीप मोहितेआ.राहुल कुल यांनीही महत्वाचे विषय मांडले.

         डॉ. सुभाष साळुंके म्हणालेलसीकरणाचा वेग वाढविण्यासोबतच कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन केले पाहीजे.

          जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदरप्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनानागरिकांची नमुना तपासणीबाधित रुग्णरुग्णालयीन व्यवस्थापनलसीकरण सद्यस्थितीम्युकरमायकोसिसचा रुग्णदरमृत्युदर संभाव्या तिस-श लाटेचा धोका लक्षात घेत लहान मुलांसाठीचे नियोजन याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

            पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त  राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

                    

            जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली.  बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments