माढा तालुक्यातील रुई म्हसोबाची येथे कैकाडी समाजाचे घर पेटवले टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल


माढा तालुक्यातील कोंढार भागातील कैकाडी समाजाचे गरीब मजूरी करणारांचे राहते घर भरदिवसा पेटवून दिल्याची घटना माढा तालुक्यातील रुई येथे घडली
माढा (कटूसत्य वृत्त):-याबाबत सविस्तर वृत्त असे की अशी रुई ता माढा येथील गायरान जमिनी मध्ये फिर्यादी सुखदेव ज्ञानदेव जाधव राहणार रुई तालुका माढा यांचे राहते पाचटाचे घर गावात राहणाऱ्या सुनिता काळे,सतीश लांडगे,दादा काळे (सर्व रा रुई तालुका माढा) यांनी गायरान आम्ही धरले आहे. तिथे आम्हाला घर बांधायचे आहे. तुला एक आठवडा झाला घर काढा असे सांगितले तरी पण तुम्ही घर का खाल्ली करत नाही असे म्हणत त्यापैकी सुनिता काळे हिने तुम्ही तिथून चालते व्हा किंवा पोलीस स्टेशनला जावा आम्ही तुमचे राहते घर पेटवून देणार आहे असे म्हणून सुनिता काळे हिने सतीश लांडगे त्याच्याकडून काडेपेटी घेऊन फिर्यादीचे उसाचे पाचटाचे गायरानातील राहते घर पेटवून देऊन. यामध्ये घरातील लोकांची कपडे, 50 किलो बाजरी, 20 किलो गहू, शेंगा असे संसारोपयोगी साहित्य रोख रक्कम 20 हजार रुपये असे एकूण 60000 रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले अशा आशयाची फिर्याद सुखदेव ज्ञानदेव जाधव (वय 55वर्ष धंदा मजुरी राहणार रुई तालुका माढा) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे वरील सर्व आरोपींवर ते विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास स.पो नि. अमित शितोळे हे करीत आहेत
या घटनेमुळे कैकडी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे लवकरात लवकर या गरीब कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रभर कैकाडी समाज आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा कैकाडी समाजाचे माढा तालुका अध्यक्ष लखन माने यांनी दिला आहे
0 Comments