Hot Posts

6/recent/ticker-posts

वनपरिक्षेत्र विभागच बनला क्रुरकर्मा,शिरभावी येथील झाडाची केली कत्तल

 वनपरिक्षेत्र विभागच बनला क्रुरकर्मा,शिरभावी  येथील झाडाची केली कत्तल 



संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची युवासेनेने केली मागणी

सांगोला (कटुसत्य वृत्त) : शिरभावी ता. सांगोला येथील 35 एकर वनक्षेत्रातील अंदाजे 10 ते 12 वर्ष वयाच्या लिंब व इतर जंगली झाडांची दस्तुरखुद्द वनविभाग कर्मचाऱ्यांकडून कत्तल केली असल्याची घटना घडली असून वनपरिक्षेत्र अधिकार्यांनीच ही झाडे jcb च्या साहाय्याने तोडली असल्याचा प्रकार युवा सेनेने उघड केला आहे.याबाबत दिलेल्या तक्रारीस वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भाटे यांनी केराची टोपली दाखविल्याने युवासेनेचे तालुका अध्यक्ष शंकर मेटकरी यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील 35 एकर क्षेत्रामध्ये असणाऱ्या झाडांची दि.21 जून ते 26 जून 2021दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती.अंदाजे 10 ते 12 वर्षे वयाच्या या जिवंत झाडांची तोड खुद्द विभागाचे अधिकारी देवकर,विजय भाटे यांच्या कडूनच करण्यात आली आहे.ही युवासेनेचे तालुका अध्यक्ष शंकर मेटकरी,समाधान चव्हाण,सुभाष भोसले यांच्या लक्षात येताच त्यांनी दि 24 जून रोजी सांगोला तालुका अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशीची मागणी केली होती. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी युवासेनेच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. यावर युवा सेनेने पुन्हा 22 जुलै रोजी निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सध्या सर्वत्र वृक्षारोपण लागवड आणि संवर्धन करण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी प्रयत्न करत असताना खुद्द वन विभागानेच झाडे तोडल्याने या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments