सांगोला शहरातील सुरु असलेल्या विकास कामांची तपासणी करावी --गटनेते सचिन लोखंडे
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहरातील सुरू असलेल्या सर्व विकासकामांची गुणवत्ता व दर्जा याबाबत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी चे गटनेते सचिन कृष्णाथ लोखंडे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
सांगोला नगरपरिषद हददीमध्ये सर्वच प्रभागात विविध विकास कामे सुरु आहेत. सर्व प्रभागातील विविध विकास कामे, त्यामध्ये गटार बांधणे, रस्ता, मुरमीकरण, डांबरीकरण, कॉक्रीटीकरण,पेव्हींग ब्लॉक, इ. कामांचा समावेश आहे. यामध्ये सर्वच कामे ही तेथील प्रभागातील नगरसेवक/नगरसेविका यांना कामांची माहिती करुण देणे,नगरपरिषदेचा प्रभारी अभियंता,सहायक अभियंता,तांत्रीक सल्लागार यांनी दररोज सुरु असलेल्या कामावर जावुन भेट देणे, कामांची पाहणी करुन सुचना करणे आवश्यक व गरजेचे आहे,त्यामुळे काम करणा-या ठेकेदारांवर चांगल्या कामासाठी दबाव राहिल व शहरातील सर्व कामे दर्जेदार,उत्तम व चांगल्या प्रतीची होतील व सदर कामावर आपला अंकुश राहील ,असे या पत्रात म्हटले आहे. परंतु सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रभारी अभियंता,सहायक अभियंता,तांत्रीक सल्लागार तथा बांधकाम,आरोग्य तथा पाणीपुरवठा विभागाचे एकही आधिकारी किंवा कर्मचारी या कामांवरती भेटी देत नाही,परिणामी सर्व कामे ही निकृष्ठ दर्जाची होत आहेत. त्यामुळे सांगोला शहरातील नागरीकांच्या सोयी सुविधांसाठी सुरु असलेली विकास कामे ही निकृष्ठ व हीन दर्जाची होऊन शासनाचा कोटयावधी रुपयाचा निधी वाया जाणार आहे. तरी कृपया वरील बाबतीत गांभीर्याने विचार करुण तातडीने सर्व कामांना आपण समक्ष भेटी देवुन कामाच्या गुणवत्तेची चौकशी करुण सांगोला शहरातील सुरु असलेली कामे चांगल्या प्रतीची होतील ते पहावे, अशा पद्धतीची लेखी मागणी सचिन लोखंडे यांनी केलेली आहे.
0 Comments