Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेस सोबत असल्यानेचं आघाडी सरकार टिकून : प्रकाशबापू पाटील

 काँग्रेस सोबत असल्यानेचं आघाडी सरकार टिकून : प्रकाशबापू पाटील


कॉंग्रेस (आय) सांगोला तालुकाध्यक्ष पदी सुनिल भोरे सर यांची निवड 



सांगोला (कटूसत्य वृत्त):- गट -तट बाजूला काढून काँग्रेस पक्षाला बळकट आणी सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. या पुढील काळात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाची ताकद उभी केली जाईल. यामध्ये प्रा. पी. सी. झपके यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन तालुकाअध्यक्ष सुनिल भोरे सर यांनी शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करुन घ्याव्यात. त्यांना ते सर्वस्व अधिकार दिले आहेत.असे सांगत, काँग्रेस सोबत आहे म्हणून हे आघाडी सरकार टिकून आहे. असे ठणकावून सांगत, सन 2024 ला स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे प्रतिपादन आय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी केले.


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील व प्रा. पी. सी. झपके सर यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक सोमवार दि. 19 रोजी आदर्श पतसंस्थेच्या हॉलमध्ये पार पडली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी सुनील भोरे सर यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील बोलत होते. या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. पी. सी. झपके सर, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे, रवी साबळे, नागेश काकडे, एन. डी.बंडगर, महादेव कांबळे, काशीनाथ ढोले, अवि देशमुख, कृष्णा भजनावळे, , फिरोज मणेरी, सुरेश डांगे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील म्हणाले, काँग्रेस हा गोरगरीब बारा बलुतेदारांचा पक्ष आहे. परंतु आज गट-तट यामुळे जनाधार कमी होतोय. यावर शिंदे साहेबांनी खंत व्यक्त केली आहे. सदर खंत दूर करण्यासाठी व गाव व तालुका आणी जिल्हा पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी येत्या काळात निश्चितच प्रयत्न केले जाणार आहेत. काँग्रेस पक्षाला माणणारा आज ही सांगोला तालुक्यात मोठा वर्ग आहे. जिल्हाध्यक्ष पदभार स्वीकारला आणि सांगोल्यात सांगोल्यात आला असता त्यावेळी पक्षात गट वाढलेले दिसून आले होते. परंतु नव्याने निवड केलेल्या अध्यक्ष यांच्या माध्यमातून गट तट संपतील. पक्षाकडून तालुका अध्यक्ष यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकद उभी केली जाईल. असाही विश्वास या निमित्ताने जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी दिला.
निवडी प्रसंगी प्राध्यापक पी.सी. झपके सर म्हणाले, काँग्रेस पक्ष हा पिछाडीवर राहिला आहे. बापूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची ताकद कमी झाली पण काँग्रेस संपले असे म्हणण्याचे धाडस कोण करत नाही. राजकीय दृष्ट्या विचार करण्याजोगा काँग्रेस पक्ष आहे म्हणूनच सत्तेतील शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाचे दरवाजे ठोठवावे लागतात. लोकसभा विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस ने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. ग्रामीण व शहरी भागात अनेक लोक काँग्रेसवर प्रेम करतात परंतु पक्षाचे अस्तित्व याबरोबर आता जुने वैभव प्राप्त करायचे आहे. यासाठी नव्या ताकदीने सर्वांनी कामाला लागावे. वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे ही त्यांनी सांगितले. 
प्रोटोकॉलच्या नावावर निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न माजी अध्यक्षांनी केल्याचे सांगून रवि साबळे यानी नुतन अध्यक्षाला सर्वसमावेशक काम करून समान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्याची मागणी केली.त्यावर उपस्थित मान्यवरांनी सहमती दर्शवित तालुक्यात कांग्रेस बळकट करण्याच्या रवि साबळे यांच्या भूमिकेला समर्थन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे, प्रा. एन. डी. बंडगर, अड. महादेव कांबळे आदींनी आपले विचार व्यक्त केले.


काँग्रेस पक्षामध्ये 1995 पासुन म्हणजेच विद्यार्थिदशेपासून काँग्रेस चळवळीमध्ये सहभाग घेतला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या पाच पदावर काम करून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम केले आहे. खऱ्या अर्थाने त्याची पोहचपावती म्हणून आज मला तालुकाध्यक्ष पदाची संधी प्राप्त झाली आहे. यापुढील काळात वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्वांना विश्वासात घेऊन सांगोला तालुक्यात कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.-- सुनिल भोरे - नूतन तालुकाध्यक्ष काँग्रेस
Reactions

Post a Comment

0 Comments