Hot Posts

6/recent/ticker-posts

हे सरकार सुडाच राजकारण करीत आहे ग्रामस्थांचा आक्रोश ; अकलूज माळेवाडी नातेपुते येथील ग्रामस्थांचा उपोषणास प्रचंड प्रतिसाद

 हे सरकार सुडाच राजकारण करीत आहे ग्रामस्थांचा आक्रोश

अकलूज माळेवाडी नातेपुते येथील ग्रामस्थांचा उपोषणास प्रचंड प्रतिसाद


अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज माळेवाडी(अ)ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये करणेबाबत व नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करणेबाबत अकलूज माळेवाडी व नातेपुते येथील ग्रामस्थांचा माळशिरस  तहसील कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलेल्या एक दिवसीय लक्षणीय उपोषणास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हे सरकार सूडाच राजकारण करीत आहे.अशा भावना सरकारचा तीव्र संताप करीत ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.


 अकलूज माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांनी सदरचे उपोषण आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले असून तिन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. यादरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, माजी जिप उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील, जि प सदस्य शितलदेवी मोहिते-पाटील, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, अकलूजचे सरपंच पायल मोरे, नातेपुते सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडी सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, आरपीआयचे नंदकुमार केंगार, किरण धाइंजे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ विविध संघटनेचे, पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकलूज माळेवाडी अ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये व्हावे याकरता शासनाकडे दिनांक 11/ 10/ 20 18 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.तर नातेपुते ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये व्हावे याकरता 28/06/ 2018 रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याबाबत शासन स्तरावर सर्व चौकशी होऊन सदरचे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना केवळ राजकीय हेतूने जाणून-बुजून अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये व नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले जात नाही याकरता सदरचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले आहे.तर शासनाने त्वरित दखल न घेतल्यास दिनांक 22/06 2021 पासून प्रांत कार्यालय अकलूज येथे तिन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे. जोपर्यंत अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर होत नाही व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. 

                        भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील

विजयदादा ग्रामविकास मंत्री असताना ग्रामपंचायतीला वेळेवर अनुदान येत होते. आता वर्ष वर्ष अनुदान मिळत नाही. अकलूज ग्रामपंचायतीमध्ये तीनशे कामगार आहेत. सर्व व्यवहार व्यवसाय बंद असल्यामुळे वसुली कशी करणार? यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना हातभार लावण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले आहे. जसे यांचे सरकार आले आहे, तसे माळशिरस तालुक्यावर अन्याय होत आहे. या सरकारने माळशिरस तालुक्याला फक्त त्रास देण्याचे काम केले आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर का केले जात नाही. प्रकरण अंतिम टप्प्यात असतानाही सरकार का भित आहे? सरकारला कशाची भीती वाटते?


आमदार राम सातपुते

या तिन्ही ग्रामपंचायतीचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. बारामतीकरांचे माळशिरस तालुक्यावर वेगळेच प्रेम आहे. जाणीवपूर्वक हे करीत आहेत. सरकार सूडाच राजकारण करीत आहे. इथल्या विकास गंगेला खीळ घालण्याचे काम सरकारने केले आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी अवस्था सरकारची झाली आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीचे नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये रूपांतर न केल्यास सरकारला धारेवर धरण्याचे काम करणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments