वादग्रस्त "परांडकाराची"होणार लवकरच उचलबांगडी--विश्वसनीय सूत्र

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहर आणि तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणारे, जनमानसाच्या अडचणी सोडविण्यासाठी अपयशी ठरलेले या विभागाचे तालुक्याचे प्रमुख परांडकर यांची लवकरच उचल बांगडी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. त्यामुळे अशा निष्क्रीय अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीने अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि दारू बंदीसाठीचा लढा उभा करण्यास प्रयत्नशील असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्य पाहणारे परांडकर यांच्या विषयी जनमानसातील प्रतिमा मलिन झाली आहे. तालुक्यातील अनेक गावातील महिलांनी या विभागाच्या अंधाधुंदी कारभारावर नाराजी व्यक्त करून आंदोलनाची तयारी केली होती. ऐन कोरोनाच्या काळात खुलेआम दारू विक्री आणि बियर बार मधून बियरची विक्री सुरू होती,यावर या विभागाने नावापुरती कारवाई करून आतून प्रोत्साहन दिल्याची चर्चा सांगोला शहर आणि तालुक्यात होत होती.
अशा निष्क्रीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते यांनी वरिष्ठ कार्यालयास केल्या होत्या. दैनिक कटूसत्य ने ही या विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा उघड करून मालिकाच प्रकाशित केली होती.याचाच परिणाम म्हणून वरिष्ठ कार्यालयाने दखल घेवून या अधिकाऱ्याची उचल बांगडी करण्याची फाईल टेबलवर आणली असल्याची कबुली वरिष्ठ अधिकारी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.येत्या काही दिवसांत परांडकर साहेबांची बदली होवून या तालुक्याला एक "डॅशिंग" अधिकारी मिळणार हे मात्र नक्की.
0 Comments