राज्यातील विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शैक्षणिक शुल्क माफ करा चेतनसिंह केदार-सावंत यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण राज्यातील प्रत्येक नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, लहान-मोठे दुकानदार आर्थिक संकटात सापडला असून अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शुल्क माफ करावे अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. एक वर्षांपासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच 14 जून पासून 2021-22 शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे. कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून, पालकांची परिस्थिती हालाकीची व अडचणीची झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय, व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या वर्गातील कुटुंबांची परवड सुरु झाली आहे. उद्योग, लहान-मोठे व्यवसाय पूर्णत: बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात होत असलेल्या आर्थिक कोंडीमुळे कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना आता काही महिने जावे लागतील.
14 जून पासून 2021-22 शैक्षणिक वर्ष सुरू होणार असले तरी अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा होतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रातील व्यवहार बंद आहेत. तसेच व्यापारामध्ये मंदी असून, शेतकरी संकटात आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी सर्व अभ्यासक्रमांसाठी काढलेले शैक्षणिक कर्ज आणि शैक्षणिक शुल्क सरकारने माफ करून विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा. मात्र काही शाळांनी पालकांकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. या त्रासापासून सर्वच कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खाजगी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित अशा सर्व शाळांचे आणि पदवीपर्यंतच्या सर्व शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क पूर्णत: माफ करावे. तसे आदेश सबंधित सर्व खाजगी शाळा-महाविद्यालयीन संस्थाचालक आणि व्यवस्थापनाला देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येऊन तसे आदेश त्वरीत संबंधितांना देण्याची मागणी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी अनेक पालकांकडे पैसे नसताना पुढच्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी पूर्ण शुल्क भरा, अशा सूचना महाविद्यालयांनी दिल्या आहेत. अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला जात आहे अशा कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांवर शैक्षणिक शुल्काची दबाव टाकणाऱ्या संस्थाचालकांवर कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तसेच राज्यातील पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करुन तात्काळ विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
0 Comments