सोलापूरचे पाणी पळविणारे पालकमंत्री भरणे यांनी पत्रकार परिषदेतुन काढला पळ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कधीतर उगवणारे व सोलापूरचे पाणी पळविणारे म्हणून ओळख निर्माण झालेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते करण मेहेत्रे यांच्या अंत्यविधीला उसळलेली गर्दी आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने केलेला कंटेनमेंट झोन यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना लक्ष् केले. राजकीय दबावाखाली पोलिस प्रशासन नागरिकांवर कारवाई करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे यावर इंदापूरच्या नागरिकांना काय आवाहन कराल असा प्रश्न विचारताच भरणे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर बोलणे टाळत थेट पत्रकार परिषदेतून ते उठले आणि इंदापूरला पळ काढला.
0 Comments