Hot Posts

6/recent/ticker-posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ सदर कार्यान्वित

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ सदर कार्यान्वित

          मुंबई, (कटूसत्य वृत्त): राज्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासन राबवित असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित करण्यात आले आहे.

          कोरोना महामारीसारख्या आपत्तीच्या काळात जनतेला वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती मिळण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘लढा कोरोनाशी’ हे नवीन सदर सुरु केले आहे. या सदरांतर्गत कोरोनासंदर्भात राज्य शासनाने घेतलेले निर्णय, राज्य आणि जिल्हास्तरीय बातम्या, लेख, दैनंदिन अहवाल एकत्रितरित्या बघता येणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments