शिधापत्रिका रद्द करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायकारक निर्णयाला तीव्र विरोध

कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):-मंगळवेढा येथे बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश देवकते यांच्या नेतृत्वाखाली शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे  परिपत्रक दहन करण्यात आले. रेशन दुकानदार हे शिधापत्रिका धारकाकडून शिधापत्रिका तपासणी अर्ज भरून घेतले जात आहेत, हमीपत्रात असे लिहिले आहे की, जर माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यच्या नांवे गॅस असल्यास माझी शिधापत्रिका रद्द करण्यात यावी, भारतात जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांना या शिधापत्रिका द्वारे जे स्वस्त धान्य मिळते या हमीपत्राच्या माध्यमातून सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांची  शिधापत्रिका रद्द करण्याचे धोरण आखले आहे. याचबरोबर काही कालांतराने रेशन दुकान ही बंद करण्याचे खुप मोठे षडयंत्र केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यातून ब्राम्हणवादी आर.एस.एस ने मोदीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचा सामूहिक नरसंहार व उपासमार करण्याचे ठरविले आहे हे स्पष्ट होत आहे.जर सरकारने हे हमीपत्र लिहून घेणे बंद केले नाही तर बहुजन सत्यशोधबक संघ शांत बसणार नाही.  याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घ्यावा.नसेल तर बहुजन सत्यशोधक संघातर्फे महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष विकास जावळे बोलताना म्हणाले की केंद्र सरकारने,दारिद्रय रेषेखाली असलेल्या प्रत्येक कुटुंबाला उज्वल गॅस योजने अंतर्गत मोफत गॅस जोडणी करून देण्यात आली होती व आता शिधापत्रिका तपासणीच्या नावाखाली गॅस जोडणी असलेले शिधापत्रिका रद्द करण्याचा केंद्र व राज्य शासनाचा अतिशय निंदनीय निर्णय घेण्यात आला आहे.अशा निर्णयामुळे गरीब जनतेची शिधापत्रिका रद्द करुन त्यांना मिळणारे स्वस्त धान्य व त्यांचे भारतीय नागरिकत्व संपवण्याचे मोठे षडयंत्र केंद्र सरकारने आखले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सचिन जावळे,कार्याध्यक्ष बाबासाहेब घनवजीर,शहराध्यक्ष जावेद पठाण ,जावेद मुलाणी, प्रोटॉन संघटनेचे अध्यक्ष अर्जुन सोनवले ,मृणालिनी थिटे,अनिता गुंगे, संजीवनी पवार, अकुबाई मुढे, नंदिनी गुंगे , शीला नरुटे, पालवी थिटे आणि राधिका लोहार व इ कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments