भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्षपदी महादेव कावळे यांची निवड

अकलूज(कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्षपदी महादेव कावळे यांची नेमणूक
करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते शिवरत्न बंगला येथे देण्यात आले.
सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांनी कार्यकारी मंडळाच्या निवडी जाहीर केल्या. यावेळी महादेव कावळे यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या अकलूज शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महादेव कावळे यांच्या निवडीमुळे आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या मित्र मंडळाकडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 Comments