कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी ग्रास्तरावर उपाययोजना
90 पालक अधिकाऱ्यांची नेमणूक
गटविकास अधिकारी-रवीकिरण घोडके

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दिसत आहे. कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांत विविध उपाययोजना करण्यात येत असून, यासाठी ग्रामस्तरावर गांवनिहाय 90 पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करुन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करण्यात आली आहे. पुर्णवेळ आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून, ग्रामस्तरीय समितीचीही स्थापना केली आहे. बाधित रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून तपासणी करण्यात यावी. गावातील रस्ते, नाल्या स्वच्छ ठेवावीत गावांत कुठेही अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानदार, फळ, भाजीपाला विक्रेत, दुध विक्रेते यांच्याशी संवादच्या माध्यमातून जनजागृती करावी. संबधित गावात एखादा बोगस डॉक्टर असल्यास त्याची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला द्यावी. सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून जनजागृती करावी.आपल्या कार्यक्षेत्रात सर्व संबधित यंत्रणांशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजन कराव्यात अशा सूचना श्री.घोडके यांनी संधितांना दिल्या.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाकडून ‘माझं गांव कोरोना मुक्त गांव’ तसेच ‘माझे दुकान-माझी जबाबदारी’ अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिबधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबधांत्मक आदेश जारी केले असून , नागरिकांनी कोरोना बाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे, तसेच कोरोना प्रतिबंधित लसिकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही गटविकास अधिकारी घोडके यांनी केले आहे.
0 Comments